esakal | "जनआरोग्य'ची स्थिती : सोलापुरातील रुग्णसंख्या सात हजार 905 अन्‌ मृत्यू 441; तरीही लाभ 664 रुग्णांनाच! 
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma Phule

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील एक हजार खासगी व सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. तरीही सद्य:स्थितीत राज्यातील अंदाजित 300 रुग्णालये सध्या सुरू आहेत. या रुग्णालयांमध्ये योजनेअंतर्गत बेडची संख्या मोजकीच असून लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटर व होम आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे. योजनेतील रुग्णालयांत वाढ करण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांना देण्यात आला. रुग्णांच्या तुलनेत रुग्णालये म्हणावी तशी वाढलेली नाहीत. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांकडून ज्यादा बिलाची आकारणी होते, बेड उपलब्ध असतानाही नसल्याचे सांगितले जाते, अशाही तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

"जनआरोग्य'ची स्थिती : सोलापुरातील रुग्णसंख्या सात हजार 905 अन्‌ मृत्यू 441; तरीही लाभ 664 रुग्णांनाच! 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला असून सोलापूर शहर-जिल्ह्यातही त्याचा वेग कायम आहे. सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वच कोरोनाबाधित रुग्णांसाठी ही योजना लागू केली. मात्र, या योजनेअंतर्गत सोलापूर शहर-जिल्ह्यातील 18 रुग्णालयांमधून कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. शहर-जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता सात हजार 905 झाली असून त्यामध्ये 441 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तरीही अवघ्या 664 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 

हेही वाचा : राज्यातील साखर कारखान्यांपुढे शॉर्ट मार्जिनचे संकट; साखर विक्रीची किंमत वाढवून द्यावी 

लॉकडाउनमुळे राज्यातील बहुतांश लहान-मोठे उद्योग बंद राहिल्याने अनेकांच्या हाताचे काम गेले. अशा परिस्थितीत त्यांना उपचाराचा खर्च परवडणार नसल्याने राज्य सरकारने सर्वच कोरोनाबाधित रुग्णांना जनआरोग्य योजनेतून उपचार देण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील एक हजार खासगी व सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. तरीही सद्य:स्थितीत राज्यातील अंदाजित 300 रुग्णालये सध्या सुरू आहेत. या रुग्णालयांमध्ये योजनेअंतर्गत बेडची संख्या मोजकीच असून लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटर व होम आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे. योजनेतील रुग्णालयांत वाढ करण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांना देण्यात आला. रुग्णांच्या तुलनेत रुग्णालये म्हणावी तशी वाढलेली नाहीत. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांकडून ज्यादा बिलाची आकारणी होते, बेड उपलब्ध असतानाही नसल्याचे सांगितले जाते, अशाही तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

हेही वाचा : धक्कादायक! कोविड केअर सेंटरमधील महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा गोंधळ अन्‌ प्रशासनाचे चौकशीचे आदेश... वाचा सविस्तर 

तक्रारी सोडविण्यासाठी समिती 
जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दीपक वाघमारे म्हणाले, सोलापूर शहर-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य सरकारने सर्वच रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पात्र रुग्णांना या योजनेतून मोफत उपचार केले जात असून आतापर्यंत 664 रुग्णांना योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्यादा बिल आकारल्याच्या तक्रारीही वाढत असून त्यावर नियंत्रण व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र समित्या नियुक्‍ती करण्यात आल्या आहेत. 

"जनआरोग्य' योजनेची स्थिती 

  • एकूण रुग्णालये : 41 
  • योजनेतील सुरू रुग्णालये : 18 
  • कोरोनासंबंधी समाविष्ट आजार : 20 
  • उपचारासाठी अर्थसहाय : 25 ते 75 हजार 
  • सोलापुरातील एकूण रुग्ण : 7,905 
  • लाभ मिळालेले रुग्ण : 664 

संपादन : श्रीनिवास दुध्याल