
सोलापूर : सरपंचासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण काढल्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. २००५, २०१०, २०१५ व २०२० मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती व सध्याच्या आरक्षणाच्या वेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्या पहिल्या बरणीत (नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी) ठेवल्या जाणार आहेत. पहिल्या बरणीतून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित करून दिलेल्या जागांच्या संख्येइतक्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. या चिठ्ठ्या दुसऱ्या भरणी ठेवून त्यातून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षणाच्या संख्येइतक्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत.