बार्शी - सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यात पोलिसांत चर्चेचा विषय झालेले बार्शी तालुका गांजा प्रकरण. भोयरे रस्त्यावर दोन ट्रक व एक कार थांबवून १ कोटी ६० लाख रुपयांचा ६९२ किलो गांजा जप्त करण्यात आला होता..एवढ्या मोठ्या प्रमाणात कोठून येत होता? याचा सखोल तपास पोलिस यंत्रणा घेत असताना संबळपूर (ओरिसा) राज्यातून गांजा महाराष्ट्रात येत असल्याची माहिती मिळाली. कारवाईमुळे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांचेसह पथकाचा सन्मान केला. सुरुवातीस पोलिसांनी एकास अटक केली होती..तपास करीत असताना आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये अंकुश दशरथ बांगर (वय-३६, रा. भोयरे, ता. बार्शी, जि. सोलापूर), दयानंद महादेव आरकिले (वय-२६, रा. श्रीपतपिंपरी, ता. बार्शी, जि. सोलापूर), संतोष अनिल गायकवाड (रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड), अमृत महादेव इथापे (वय-३२, रा. चिंचोली, ता. आष्टी, जि. बीड), आनंद विलास काळे (वय-३९, रा. मसोबागल्ली, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), दिग्विजय उर्फ राज सुभाष घोळवे (वय-३०, रा. कॅन्सर हॉस्पीटलजवळ, बार्शी, जि. सोलापूर), कृष्णा विठ्ठल दुरगुळे (वय-३०, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव), बालाजी उत्तम कदम (वय-४३, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी न्यायालयीन कोठडीत असलेल्यांची नावे आहेत..बार्शी-भोयरे रस्त्यावर साफळा रचण्यात आला पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर, तालुका पोलिस ठाण्याचे दिलीप ढेरे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवून वाहन अडवले होते.दोन ट्रक आणि एक स्विफ्ट कार यांना पोलिसांनी थांबवले तपासणी केली असता उग्र वास येणारा अंमली पदार्थ गांजा असल्याचे दिसून आले. यावेळी वाहनातून इतर जण पळून गेले. अंकुश बांगर यांस पोलिसांनी पाठलाग करुन पकडले होते. सुमारे एक कोटी ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तपासात अद्यापपर्यंत आठ जणांना अटक झाली असून, अजून काहीं धागेदोरे सापडतात का? याची चौकशी सुरु आहे..बार्शी तालुका पोलिसांना गुरुवार (ता. २१ ऑगस्ट) रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान गांजा हद्दीतून जाणार आहे , शी माहिती मिळाली होती. पण इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडेल याची कल्पनाही आली नव्हती. मोठ्या प्रमाणात गांजा खरेदीसाठी मोठी रक्कम होत असल्याने दहा ते बारा जण एकत्र येत आहेत. तसेच प्रत्येक जण गांजा स्वतःच्या ठिकाणी उतरुन घेऊन पुढे घेऊन जात असत, असे निदर्शनास आले आहे. गांजा वहातूकीचा संशय राज्यात कोठेही आला नाही, पण आम्हाला माहिती मिळाल्याने पकडला गेला.- दिलीप ढेरे, सहायक पोलिस निरीक्षक,बार्शी तालुका पोलिस ठाणे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.