Solapur Building Collapse : बाळीवेसमधील जुन्या घराचा धोकादायक भाग कोसळला; महापालिकेने नोटीस देऊनही पाडण्याकडे दुर्लक्ष
Solapur Municipal Body Ignored Demolition Warning : महापालिका आपत्कालीन विभाग आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. अग्निशामक दलाने आजोऱ्याखाली असलेली वाहने बाहेर काढली. आपत्कालीन यंत्रणेने येथील आजोरा, पत्रे, वासे बाजूला काढले. त्यानंतर येथील रस्ता पूर्ववत सुरू करण्यात आला.
Neglect turns dangerous — portion of old house in Balives collapses despite demolition notice by civic body."esakal
सोलापूर : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बाळीवेसमधील एका जुन्या घराचा काही भाग बुधवार रात्री अचानक कोसळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिका आपत्कालीन विभाग आणि अग्निशामक दलाच्या पथकाने तत्काळ कार्यवाही करून आजोरा आणि वाहने बाजूला काढली.