सासूच्या पार्थिवाला सुनांनी व नातींनी दिला खांदा

सासूच्या पार्थिवाला सुनांनी व नातींनी दिला खांदा
Updated on: 
Summary

मळेगाव येथील मुंढे कुटुंबीयांनी दिला सामाजिक परिवर्तनाचा संदेश

मळेगाव (सोलापूर): बार्शी तालुक्‍यातील मळेगावचे माजी सरपंच गुणवंत मुंढे यांच्या मातोश्री दमयंती कारभारी मुंढे (वय 72) यांचे निधन झाले. पारंपरिक पध्दतीला छेद देत मुंढे कुटुंबातील सुनांनी आपल्या सासूला व नातींनी आजीला खांदा देत समाजात परिवर्तनाचा संदेश दिला आहे. सुनाही मुलीसारख्या आणि सासूही आई समान, असे नाते जपणाऱ्या मुंढे कुटुंबातील सासू-सुनांच्या नात्याचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे. सासूबाईंच्या पार्थिवाला बुधवारी चारही सुनांनी व नांतीनी खांदा दिला.

सासूच्या पार्थिवाला सुनांनी व नातींनी दिला खांदा
आदर्श गाव ! सलग 45 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक नाही; मळेगाव ठरतंय राज्यातील रोल मॉडेल 

अध्यात्माची साथसंगत असलेल्या दमयंती यांनी आयुष्यात देवधर्मासोबतच तत्व आणि मूल्यांचही पालन केले. त्यांनी आपल्या चारही सुना अनिता यशवंत मुंढे, वैशाली जयवंत मुंढे, अर्चना गुणवंत मुंढे आणि मनोरमा बळवंत मुंढे यांना कायम मुलींप्रमाणे प्रेम आणि माया दिली. या सुनांनीही कधी सासूबाईंचा शब्द खाली पडू दिला नाही की, शब्दाने कधी दुखावले नाही. वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दमयंती यांना प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आणि जेव्हाच्या तेव्हा अगदी मागण्या अगोदर हजर असे. त्यातही चौघींपैकी कधी कोणी तू-मी असे केले नाही. त्यांच्यातले नाते म्हणजे सासू-सून नाही तर माय-लेकी प्रमाणेच फुलत गेले आणि शेवटपर्यंत टिकलेही.

सासूच्या पार्थिवाला सुनांनी व नातींनी दिला खांदा
मळेगाव परिसरात मुसळधार पाऊस, शेताला आले तळ्याचे स्वरूप

दरम्यान, श्रीकृष्णाच्या निस्सीम भक्त असलेल्या दमयंती यांचे श्रीकृष्णाचा वार असलेल्या बुधवारी आणि एकादशीच्या दिवशीच निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. दुपारी अंत्ययात्रा निघाली त्यावेळी प्रेताला खांदा देण्यासाठी चारही सुना व नात गौरी मुंढे, संपदा मुंढे, संस्कृती मुंढे, तन्वी मुंढे पुढे आल्या. दमयंती यांचे भाऊ चंद्रकांत, हरिश्‍चंद्र आणि संभाजी तर मुले यशवंत, जयवंत, गुणवंत, बळवंत यांनी देखील खांदा दिला. दमयंती यांचे पती माजी प्राचार्य कारभारी मुंढे यांनी या बदलास संमती दिली.

सासूच्या पार्थिवाला सुनांनी व नातींनी दिला खांदा
मळेगाव येथे बंधारा पाडून नुकसान

पंचायत समिती सदस्य म्हणून वेगळा ठसा

स्वतः दमयंती या पंचायत समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. पंचायत समितीचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दमयंती मुंढे यांनी सर्वसामान्य जनतेची कामे करून राजकारणात देखील वेगळाच ठसा उमटवला. याशिवाय संपूर्ण राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून आपल्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तत्कालीन सरपंच गुणवंत मुंढे यांच्या त्या मातोश्री होत. ज्या सासु-सुनांच्या भांडणांचे भांडवल करून टीव्ही सिरीयल जोमात चालतात. आणि त्यांचे अनुकरण करुन आपल्या घरातील वातावरण बिघडवतात, अशा सासू सुनांच्या डोळ्यात मुंढे कुंटुंबांने झणझणीत अंजन घातले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com