esakal | अधिकाऱ्यांच्या गावातील रँचो, लॉकडाउनमध्ये केले 58 इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकाऱ्यांच्या गावातील रँचो, लॉकडाउनमध्ये केले 58 इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट

अधिकाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावातील या रँचोने गेल्या वर्षभरापासून वयाच्या 18 व्या वर्षीच 58 प्रकारचे विविध इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट तयार केले आहेत.

अधिकाऱ्यांच्या गावातील रँचो, लॉकडाउनमध्ये केले 58 इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर): अचानक आलेल्या कोरोना या महामारीमुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा मोठा फटाका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यात गेल्या वर्षीपासून ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु ध्येयवेड्या विद्यार्थ्यांनी या लॉकडाउनचा पुरेपूर फायदा घेतला असून, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या वेळेत वेगवेगळे प्रोजेक्ट बनवलेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे उपळाई बुद्रूक येथील ओंकार भारत जाधव. अधिकाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावातील या रँचोने गेल्या वर्षभरापासून वयाच्या 18 व्या वर्षीच 58 प्रकारचे विविध इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट तयार केले आहेत.

हेही वाचा: बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा 

पंढरपूर येथील स्वेरीच्या कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या ओंकार जाधव याला लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक विषयाची आवड. त्यामुळे माध्यमिक शिक्षण घेत असताना विज्ञान प्रदर्शनात तो आवर्जून सहभाग घेत असायचा. दहावीत असताना त्याने बनवलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्टला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. त्यामुळे त्याने या क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. व इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमासाठी पंढरपूर येथील स्वेरीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पहिल्या वर्षाचे सत्र पूर्ण होण्याअगोदरच कोरोना या महामारीने थैमान घातल्याने कॉलेज बंद झाले. अन् ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता बाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. परंतु विद्यार्थ्यांची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही याची प्रचिती ओंकारच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट वरून दिसून येते.

हेही वाचा: उपळाई बुद्रुकच्या शिंदे बंधूंचे सातासमुद्रापार पाऊल 

दिवसभर वडिलांना शेतीच्या कामात मदत करत, ऑनलाईन शिक्षणातून मिळालेल्या वेळेत ओंकारने विविध प्रकारचे शेतीसाठी व घरगुती वापरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य व मोबाईलच्या मदतीने विविध प्रकल्प तयार केले आहेत. त्यातील शेतकऱ्यांसाठी असलेला म्हणजे बागेत फवारणी करताना पाण्याच्या टाकीत असलेली पाणी क्षमता मोजण्याचे इलेक्ट्रॉनिक यंत्र, तसेच अचानक घरातून बाहेर गेल्यास घरातील दिवाबत्ती फॅन व इतर इलेक्ट्रॉनिक साधने मोबाईल वरून बंद करणे, वेब कॅमेरा, घरातील वस्तू शोधणारा रोबोट, इलेक्ट्रिकल वायरलेस नोटीस बोर्ड, शरीराचे तापमान व ऑक्सिजन मोजण्याची मशीन, सॅनिटायझर मशीन अशा विविध प्रकारचे कमी खर्चात व लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरण्यायोग्य इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट करण्यासाठी तो दररोज धडपड करत आहे.

हेही वाचा: अधिकाऱ्यांच्या गावात अजून एक आयएएस अधिकारी! उपळाई बुद्रूकच्या अश्विनी वाकडे यांचे यश 

तो सध्या डिप्लोमाला इलेक्ट्रॉनिक च्या तिसऱ्या वर्षात शिकत असून गेली दिड वर्षापासून तो ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. वय अवघे 18 वर्षे असून कमी कालावधीत त्यांने अनेक प्रोजेक्ट केल्याने नागरिकांमधून त्याच्या प्रोजेक्टचे कौतुक होत आहे. त्याला शास्त्रज्ञ व्हायचे असून, त्यासाठी तो सतत असे वेगवेगळे प्रयोग करून कष्ट घेत आहे.

हेही वाचा: उपळाई आरोग्य केंद्रात त्रुटी! तपासणीसाठी आयएएस आव्हाळेंची नेमणूक

शाळेत शिकत असताना नंदिकेश्वर विद्यालयातील मकरंद रिकीबे यांनी प्रोत्साहन दिल्याने, या क्षेत्राकडे आकर्षित झालो. त्यांच्या व स्वेरीच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन प्रोजेक्ट करण्यावर माझा भर असून, शेतकऱ्यांना मदत होईल असे इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट तयार करण्यासाठी माझे प्रयत्न असतात. इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा पुनर्वापर करून आतापर्यंत 58 प्रोजेक्ट केलेले आहेत.

- ओंकार जाधव, विद्यार्थी-उपळाई बुद्रूक.

loading image
go to top