रविवारी एकाच दिवशी 2625 जण कोरोनामुक्त ! जिल्ह्यातील 52 जणांचा मृत्यू

रविवारी एकाच दिवशी 2625 जण कोरोना आजारातून मुक्त झाले
corona
coronaMedia Gallery
Updated on: 

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील 2625 जण एकाच दिवशी कोरोनामुक्त (Covid-19) झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 2338 तर महापालिका हद्दीतील 287 जणांचा यामध्ये समावेश आहे. कोरोनामुळे 52 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातील 45 व्यक्ती या ग्रामीण भागातील तर सात व्यक्ती या महापालिका हद्दीतील आहेत. (on Sunday, 2625 people were freed from corona disease in Solapur city and district)

आज जिल्ह्याच्या आकडेवारीत 1908 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये 1777 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 131 रुग्ण ही महापालिका हद्दीतील आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 18 हजार 796 एवढी झाली आहे. त्यातील 17 हजार 224 रुग्णही ग्रामीण भागातील तर 1572 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत.

corona
पोटनिवडणुकीची ड्यूटी करून शिक्षकाने घर गाठले, मात्र कोरोनाही सोबतच आला अन्‌ हसतं-खेळतं कुटुंब...

दक्षिण सोलापूर, माढ्यात प्रत्येकी 8 मृत्यू, सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 45 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्कलकोट तालुक्‍यात 79 तर उत्तर सोलापूर तालुक्‍यात 59 नवीन रुग्ण आढळले असून या दोन्ही तालुक्‍यातील एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. बार्शी तालुक्‍यात 150 रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्‍यात 200 रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. माढा तालुक्‍यात 254 रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

माळशिरस तालुक्‍यात 347 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. मंगळवेढा तालुक्‍यात 123 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्‍यात 137 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्‍यात 328 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सांगोला तालुक्‍यात 33 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 67 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com