Sangola News : पाण्यासाठी आजी-माजी आमदार आक्रमक; कालवा सल्लागार समिती बैठकीत विचारणा, हक्काच्या पाण्याची मागणी

हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराच आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला
Once again former MLA aggressive for sangola tembu and mhaisal water Yojana shahaji patil deepak salunkhe patil
Once again former MLA aggressive for sangola tembu and mhaisal water Yojana shahaji patil deepak salunkhe patilSakal

सांगोला : टेंभू व म्हैसाळ योजनेच्या सांगोला तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा आजी-माजी आमदार आक्रमक झाले आहेत. नियोजनानुसार ‘टेल टू हेड’प्रमाणे हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराच आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.

कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू उपसा सिंचन या योजनांची कालवा सल्लागार समितीची बैठक रविवारी (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीसाठी खासदार संजय पाटील, आमदार शहाजी पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुमन पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार शहाजी पाटील म्हणाले, ‘टेल टू हेड’ पाणी मिळण्यासाठी नियोजन करावे. त्याचबरोबर आवर्तन चालू असताना आवर्तन यशस्वी होण्यासाठी अधिकाऱ्याने त्या ठिकाणी उपस्थित राहावे.

माजी आमदार साळुंखे- पाटील म्हणाले, सांगोला तालुका हा टेंभू आणि म्हैसाळ योजनेच्या शेवटी म्हणजे टेलला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्याला देत असताना संबंधित प्रशासनाचे नियोजन नसल्याने नेहमीच सांगोला तालुक्यावर अन्याय होत आला आहे.

परंतु, रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या आवर्तनात आम्ही तालुक्यावर होणारा अन्याय अजिबात खपवून घेणार नाही. आमच्या हक्काचे संपूर्ण पाणी मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार बोलून दाखविला.

टेंभूचे पाणी १५ जानेवारीपर्यंत सांगोल्यात

रब्बी हंगामाचे म्हैसाळ योजनेचे पंप १७ नोव्हेंबर रोजी चालू होतील व टेंभू योजनेचे रब्बी हंगामाचे पंप १५ डिसेंबर रोजी सुरू होतील. टेंभूचे पाणी १५ जानेवारीपर्यंत सांगोला तालुक्यामध्ये पोचेल. या पाण्यामधून दोन्ही योजनांचे रब्बी हंगाम आवर्तन यशस्वी केले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तसेच टेंभू आणि म्हैसाळ दोन्ही योजनांची आवर्तने नियमाप्रमाणे पूर्ण होतील, असेही सांगितले.

दुजाभाव न करण्याची आवताडेंची मागणी

म्हैसाळ योजनेतून येत्या १७ नोव्हेंबरपासून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असून, यादरम्यान तालुक्याला पाणीपुरवठा करत असताना वरच्या भागात पूर्णपणे भारनियमन करून पूर्ण दाबाने पाणी द्यावे. मंगळवेढा तालुक्याला पाणी देताना दुजाभाव करू नये, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली.

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीच्या आमदार आवताडे यांनी ही मागणी केली.

यावेळी आमदार आवताडे यांनी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या गावांना फक्त सहा टक्के पाणी आजपर्यंत देण्यात आले.

या योजनेतील पूर्ण पाण्याची मागणी केल्यावर विविध तांत्रिक कारणांचा आधार घेऊन पाणी वाटपाचा हा कोणता न्याय करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित केला. तालुक्याला पाणी देताना दुजाभाव होत असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत मंत्री खाडे यांनी तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com