esakal | Solapur : दीड लाख मुले घेताहेत ऑफलाइन शिक्षण! नियम पाळून 750 शाळा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या जवळपास 750 शाळांमधील दीड लाख विद्यार्थ्यांना पारावर, कट्ट्यावर, समाज मंदिराच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.

दीड लाख मुले घेताहेत ऑफलाइन शिक्षण! नियम पाळून 750 शाळा सुरू

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या जवळपास 750 शाळांमधील दीड लाख विद्यार्थ्यांना पारावर, कट्ट्यावर, समाज मंदिराच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. पालकांचे हातावरील पोट असल्याने त्यांच्याकडे मुलांना ऑनलाइन शिक्षण (Online Education) देण्यासाठी ऍन्ड्राइड मोबाईल नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात हा उपक्रम सुरूच आहे. कोरोनाच्या (Covid-19) सर्व नियमांचे पालन करून मागील काही महिन्यांपासून हा प्रयोग यशस्वीपणे सुरू आहे.

हेही वाचा: JEE Advanced चा निकाल होणार 15 ऑक्‍टोबरला जाहीर! तपासा 'या' वेबसाइटवर

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आणि तिसऱ्या लाटेची शक्‍यता धूसर झाल्याने राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तर शहरातील आठवी ते बारावीच्या ऑफलाइन शाळा सुरू झाल्या. काही अपवाद वगळता बहुतेक विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित आहेत. सद्य:स्थितीत राज्यातील 51 हजार शाळांमध्ये 55 लाखांहून अधिक विद्यार्थी हजेरी लावत आहेत. दुसरीकडे पहिली ते चौथीतील जवळपास एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत आहे. चिंतेची बाब म्हणजे, त्यातील बहुतेक मुलांकडे ऍन्ड्राइड मोबाईल नाहीत. तर काही पालकांनी मुलांमधील वाढलेल्या व्याधींचा विचार करून त्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे.

बालवयात त्या मुलांमधील शिक्षणाची गोडी टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. या पार्श्‍वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नियम तंतोतंत पाळून त्या मुलांना ऑफलाइन शिक्षण दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये विशेषत: संपूर्ण कोरोनामुक्‍त झालेल्या गावांमध्ये "पारावरची शाळा' हा उपक्रम सुरू असून त्याची माहिती वरिष्ठांनाही देण्यात आली आहे. ज्यांचे पालक दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात, हातावरील पोट असल्याने महागडा मोबाईल घेऊ शकत नाहीत, ज्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे अशक्‍य आहे, त्यांच्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरू लागला आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरळीत सुरू आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढू लागली आहे. परंतु, पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांकडे विशेषत: ग्रामीण भागातील मुलांच्या पालकांकडे ऍन्ड्राइड मोबाईल नसल्याने बहुतेक मुले शिक्षणापासून दूर आहेत. त्यांच्यासाठी कोरोनाचे नियम पाळून ऑफलाइन शिक्षण दिले जात आहे.

- दिलीप स्वामी, सीईओ, सोलापूर जिल्हा परिषद

हेही वाचा: भारतीय लष्करात टेक्‍निकल एंट्री स्कीम! अर्ज प्रक्रियेला सुरवात

जिल्ह्यातील स्थिती

  • पहिली ते आठवीच्या शाळा : 2,798

  • विद्यार्थ्यांची संख्या : 2,01,792

  • ऍन्ड्राइड मोबाईल नाहीत : 97,426

  • पहिली ते चौथीच्या ऑफलाइन शाळा : 790

  • ऑफलाइन शाळांमधील विद्यार्थी : 1.50 लाख

loading image
go to top