रूग्ण घटल्याने 22 हजार बेड शिल्लक!  'म्युकरमायकोसिस'चा प्रादुर्भाव नियंत्रणात

रूग्ण घटल्याने 22 हजार बेड शिल्लक!  'म्युकरमायकोसिस'चा प्रादुर्भाव नियंत्रणात
Summary

कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात येऊ लागली असून शहरातील ऍक्‍टिव्ह रूग्णसंख्या प्रथमच दोनशेच्या आत आली आहे. तर ग्रामीणमध्येही ऍक्‍टिव्ह रूग्ण कमी झाले आहेत.

सोलापूर : शहरातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट पूर्णपणे आटोक्‍यात आली असून ग्रामीणमधील रूग्णसंख्याही घटू लागली आहे. रूग्णसंख्या घटल्याने सद्यस्थितीत जिल्हाभरात तब्बल 22 हजार 295 बेड शिल्लक आहेत. सध्या शहरातील 198 तर ग्रामीणमधील दोन हजार 827 रूग्णांवर विविध रूग्णालयातून उपचार सुरू आहेत. शहरात 13 तर ग्रामीणमध्ये 487 रूग्ण वाढले आहेत. (The number of corona patients in Solapur is declining)

रूग्ण घटल्याने 22 हजार बेड शिल्लक!  'म्युकरमायकोसिस'चा प्रादुर्भाव नियंत्रणात
सप्टेंबरमध्येच संयुक्‍त पूर्व परीक्षा! मुंबईतील पावसानंतर आयोगाची सावध भूमिका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णवाढीचा दर सर्वाधिक राहिला. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शहर-जिल्ह्यात 22 हजार 412 साधे बेड्‌स तर दोन हजार 973 ऑक्‍सिजन बेड्‌स, 329 व्हेंटिलेटर आणि एक हजार 198 आयसीयु तयार करण्यात आले. तरीही, अनेकांना वेळेत बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला. तर काहींनी बेड मिळत नसल्याने घरीच थांबणे पसंत केले. त्यामुळे मृत्यूदर सुरवातीपासूनच वाढत गेल्याचे सांगितले जाते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात येऊ लागली असून शहरातील ऍक्‍टिव्ह रूग्णसंख्या प्रथमच दोनशेच्या आत आली आहे. तर ग्रामीणमध्येही ऍक्‍टिव्ह रूग्ण कमी झाले आहेत.

रूग्ण घटल्याने 22 हजार बेड शिल्लक!  'म्युकरमायकोसिस'चा प्रादुर्भाव नियंत्रणात
अभियांत्रिकी सेवा पूर्व, संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय

सध्या 19 हजार 534 साधे बेड, दोन हजार 601 ऑक्‍सिजन बेड, 220 व्हेंटिलेटर आणि 840 आयसीयु बेड शिल्लक पडल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले. दुसरीकडे सद्यस्थितीत 372 रूग्ण ऑक्‍सिजन बेडवर, 220 व्हेंटिलेटरवर तर 358 रूग्ण आयसीयुत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी अक्‍कलकोट तालुक्‍यातील चार, मोहोळ तालुक्‍यातील सर्वाधिक पाच, पंढरपूर तालुक्‍यातील तीन तर बार्शी, करमाळा, माढा या तालुक्‍यातील प्रत्येकी एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शहरातील एका गळफास घेतलेल्या मृत व्यक्‍तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

रूग्ण घटल्याने 22 हजार बेड शिल्लक!  'म्युकरमायकोसिस'चा प्रादुर्भाव नियंत्रणात
UPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली

'म्युकरमायकोसिस' येऊ लागला नियंत्रणात

शहर-जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 419 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 35 जणांचा मृत्यू झाला असून 210 रूग्णांनी या आजारावर मात केली आहे. सध्या शहर-जिल्ह्यातील 32 रूग्णालयात 174 रूग्ण उपचार घेत आहेत. मागील दोन दिवसांत या आजाराचे नवे रूग्ण आढळले नाहीत. तर मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. (The number of corona patients in Solapur is declining)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com