esakal | आज दीड हजार नवे कोरोनाबाधित ! 24 जणांचा मृत्यू; 1111 जण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

आज दीड हजार नवे कोरोनाबाधित ! 24 जणांचा मृत्यू; 1111 जण कोरोनामुक्त

sakal_logo
By
प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर व जिल्ह्यात आज तब्बल दीड हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यातील 1 हजार 129 रुग्ण ग्रामीण भागातील तर 371 रुग्ण महापालिका हद्दीतील आहेत. कोरोनामुळे 24 जणांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातील 17 जण ग्रामीण भागातील तर 7 जण महापालिका हद्दीतील आहेत. आज एकाच दिवशी 1 हजार 111 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये 562 जण ग्रामीण भागातील तर 549 जण महापालिका हद्दीतील आहेत.

रुग्णालयात सध्या 10 हजार 183 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 6 हजार 802 रुग्ण ग्रामीण भागातील तर तीन हजार 380 जण रुग्ण महापालिका हद्दीतील आहेत. आजच्या अहवालात मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये सोलापूर शहरातील विजयपूर रोड परिसरातील सिटिजन पार्कमधील 85 वर्षीय पुरुष, देगाव रोड परिसरातील डफळेकर नगर येथील 70 वर्षीय पुरुष, मुरारजी पेठ परिसरातील सिद्धीजिन सोसायटीतील 65 वर्षीय महिला, लिमयेवाडी परिसरातील अमोल नगर येथील 72 वर्षीय पुरुष, विजयपूर रोड परिसरातील सर्वोदय सोसायटीतील 76 वर्षीय पुरुष विजापूर रोड झोपडपट्टी नंबर 1 परिसरातील 75 वर्षीय पुरुष आणि विजयपूर रोड परिसरातील सुशील नगर येथील 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

माळशिरस तालुक्‍यातील फळवणी येथील 61 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, यशवंत नगर येथील 66 वर्षीय महिला, अक्कलकोट तालुक्‍यातील सांगवी बुद्रुक येथील 52 वर्षीय पुरुष, तडवळे येथील 50 वर्षीय पुरुष, तडवळ येथील 59 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील मालवंडी येथील 48 वर्षीय महिला, बार्शीतील ब्राह्मण गल्ली येथील 70 वर्षीय पुरुष, बार्शीतील अलीपूर रोड येथील 45 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील दहिटणे येथील 64 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. मंगळवेढ्यातील किल्ला बाग परिसरातील 46 वर्षीय महिला, मंगळवेढ्यातील चोखामेळा नगर मधील 80 वर्षीय पुरुष, मंगळवेढ्यातील दत्तू गल्ली येथील 73 वर्षीय पुरुष, मंगळवेढा तालुक्‍यातील घरनिकी येथील 78 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नवीन विडी घरकुल येथील 65 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे येथील 39 वर्षीय महिला व करमाळ्यातील भीम नगर येथील 22 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तीन तालुक्‍यांत एकाच दिवशी दोनशेहून अधिक बाधित

बार्शी, माळशिरस, पंढरपूरमध्ये एकाच दिवशी दोनशेहून अधिक रुग्ण आज आढळले आहेत. आजच्या ग्रामीण भागाच्या अहवालात 1 हजार 129 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 248, माळशिरस तालुक्‍यात 224, माढा तालुक्‍यात 206 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. बार्शीत 137 तर करमाळ्यात 104 नवीन रुग्ण आढळले आहेत. आजच्या मृतांमध्ये अक्कलकोट व माळशिरस तालुक्‍यातील प्रत्येकी तीन, बार्शी व मंगळवेढा तालुक्‍यातील प्रत्येकी चार, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दोन व करमाळा तालुक्‍यातील एका रुग्णाचा समावेश आहे.