सोलापूर : सुपारी ट्रक अपहरण प्रकरणी एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

सोलापूर : सुपारी ट्रक अपहरण प्रकरणी एकाला अटक

कुर्डुवाडी - कर्नाटकमधून उत्तरप्रदेश येथे ट्रक कंटेनरमधून घेउन जात असलेल्या सुमारे एक कोटी ३३ लाख रुपयांच्या सुपारीचा दोन ट्रक चालकांनी अपहार केला होता. त्यापैकी ९७ लाख ६५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह एका चालकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कुर्डुवाडी पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली.

शोध मोहिम यशस्वी होण्यामध्ये ट्रकचे जीपीएस व मोबाईल लोकेशनच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने मोलाची भूमिका पार पाडली. वाहनचालक संतोष चंद्रप्पा एन्नर (रा, हिरेकेरुर, कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने उद्यापर्यंत (शुक्रवार) पोलिस कोठडी सुनावली आहे. व्हीआरएल लॉजिस्टिक्स लि. हुबळी या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रक म्हैसगाव (ता. माढा) येथे रस्त्याच्या बाजूला आढळून आला होता. दोन्ही चालकांनी पलायन केले होते व माल ही गायब केला होता. याबाबत ट्रान्सपोर्ट कंपनीचे सोलापूर येथील सहायक व्यवस्थापक केशव हिरासकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वसंतकुमार एस. नारायणाप्पा व संतोष चंद्रप्पा एन्नर यांच्या विरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांच्या सुचनेनुसार कुर्डुवाडीचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने कर्नाटकातील हुबळी, चित्रदुर्ग, बंगळुरु, हवेरी, तुमकुर या ठिकाणी शोध घेतला. यामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, सुशांत शिंदे, विश्‍वजित ठोंगे, व्यंकटेश मोरे, आबासाहेब मुंढे, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, सलीम बागवान, रवी माने, सचिन गायकवाड यांनी कामगिरी बजावली.

सायबर सेलची झाली मदत

सायबर सेलकडून ज्याठिकाणी माल दुसऱ्या गाडीत भरण्यात आला तेथील मोबाईल लोकेशनही पाहण्यात आले. या मदतीने कर्नाटकातून एन्नर यास पोलिसांनी अटक केली. सदर अपहार केलेल्या मुद्देमालापैकी भिमसमुद्र (जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) येथुन ९७ लाख ६५ हजार रुपयांची २१ टन सुपारी हस्तगत केली.

Web Title: One Arrested In Betel Nut Truck Hijacking Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policecrimeArrested
go to top