esakal | मोहोळ-पंढरपूर मार्गावर अपघात! एक ठार, एक जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

मोहोळ-पंढरपूर मार्गावर अपघात! एक ठार, एक जखमी

मोहोळ-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचा अपघात होऊन एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.

मोहोळ-पंढरपूर मार्गावर अपघात ! एक ठार, एक जखमी

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ (Mohol) - पंढरपूर (Pandharpur) राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) दुचाकीचा अपघात (Accident) होऊन एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (ता. 14) रात्री आठ वाजता पोखरापूर शिवारात घडला. नीलेश अनंता चवरे (वय 23, रा. पेनूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर रमेश अशोक पाटकर (वय 22, रा. कुरुल) असे जखमीचे नाव आहे.

हेही वाचा: बार्शी तालुक्‍यातील जवळगाव प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल!

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश चवरे व त्याचा मित्र रमेश पाटकर हे दोघे मंगळवारी दुचाकी (क्र. एम. एच. 13 - डी के 4211) वरून पेनूरकडे निघाले होते. रात्री आठ वाजता त्यांची दुचाकी मोहोळ - पंढरपूर महामार्गावरील पोखरापूर गावाच्या शिवारात आली असता, दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. यामध्ये नीलेश चवरे याच्या डोक्‍याला मार लागल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला तर त्याचा मित्र रमेश पाटकर हा गंभीर जखमी झाला.

मोहोळ पोलिसात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे पेनूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत .

हेही वाचा: शाळा सुरू करण्याचा 'या' दिवशी निर्णय! मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

अतिवेग ठरला अपघातास कारणीभूत

पंढरपूर - मोहोळ पालखीमार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे वाहतूक करताना वळणा-वळणाचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. त्यातच पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर काही ठिकाणी चिखल व दलदलही असते. अशा प्रसंगी वाहन सावकाश व सुरक्षित चालवणे हिताचे ठरते. मात्र, नीलेश चवरे व रमेश पाटकर यांनी दुचाकी अतिवेगाने चालवल्याने त्यांची दुचाकी घसरून हा भीषण अपघात झाला व त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाल्याचे पोखरापूर शिवारातील ग्रामस्थांच्या चर्चेतून समोर आले आहे.

loading image
go to top