Prashant Tekale
sakal
मोहोळ - सावळेश्वरहुन सोलापूरकडे रुग्णालयात उपचारासाठी निघालेल्या वडील व मुलाच्या दुचाकीला पाठीमागून कंटेनरने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहोळ- सोलापूर महामार्गावर सावळेश्वर गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात प्रशांत हरी टेकाळे (वय-27) या तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचे वडील हरि टेकाळे जखमी असून त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.