मुंबईहून सांगोला तालुक्‍यात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

one person Corona positive from mumbai coming to the sangola taluka
one person Corona positive from mumbai coming to the sangola taluka
Updated on

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील पाचेगाव खुर्द येथे मुंबईहून आलेल्या परंतु शाळेत संस्थात्मक विलगीकरण करून ठेवण्यात आलेला एक जण कोरोना पॉजिटिव्ह आल्याची माहिती प्रातांधिकारी उदयसिंह भोसले यांनी आज दिली. कोरोना बाधित रुग्णाच्या जास्त संपर्कातील 13 जणांना मेडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व कमी संपर्कातील 20 जणांपैकी 19 जणांना राजुरी शाळेतच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एक परिचारिकेला होम क्वारंटाईन केले आहे. तालुक्‍यात अजून एक नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
पाचेगाव खुर्द येथील एकजण त्याच्या कुटुंबासह मुंबई विक्रोळी येथून ता. 14 मे रोजी आवश्‍यक ती परवानगीसह सांगोला तालुक्‍यामधील पाचेगाव खुर्द (मिसाळवाडी) या गावी जाण्यासाठी आला. सांगोला तालुक्‍यात आल्यानंतर रेड झोनमधून आल्यामुळे त्या व्यक्तीला व त्यांच्यासोबत आलेल्या 13 लोकांना गुरुकुल विद्यालय, राजुरी येथे संस्थात्मक विलगीकरण करून ठेवण्यात आले होते. त्यानुसार सदरची व्यक्ती गुरुकुल विद्यालय, राजुरी येथे ता. 14 मेपासून राहण्यास होता. त्यानंतर ता. 17 मे रोजी त्यापैकी एका इसमास सर्दी, खोकला, ताप व धाप लागणे अशी लक्षणे दिसून आल्यामुळे त्यास सोलापूर येथे कोरोना विषयक तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथे त्याची तपासणी केल्यानंतर सदर व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याचा तात्पुरता रहिवास असलेले गुरुकुल विद्यालय, राजुरीपासून एक किलोमीटरपर्यंत क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर त्या पुढील एक किलोमीटर क्षेत्र हे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच त्याच्या निकटतम संपर्कातील जास्त धोका असणारे म्हणून 13 व्यक्ती निश्‍चित करण्यात आलेले आहेत. या व्यक्तींना लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडशिंगी (ता. सांगोला) येथील कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरण करून ठेवण्यात आलेले असून त्यांचे नमुने घेऊन ते पुढे तपासणीला पाठवण्यात येणार आहेत. तसेच कमी संपर्क असणाऱ्या व्यक्ती म्हणून एकूण 20 व्यक्ती निश्‍चित करण्यात आलेले आहे. त्यापैकी 19 जणांना गुरुकुल विद्यालय, राजुरी येथे संस्थात्मक विलगीकरण करून ठेवण्यात आलेले आहे. कोळा येथील एक परिचारिकेला घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आज कोरोना बाधित आढळलेली व्यक्ती सांगोला तालुक्‍यात आल्यापासूनच संस्थात्मक विलगीकरण कक्षात असल्याने त्याचा संपर्क कमीत कमी राहण्यास मदत झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com