
मोहोळ मंडळातील प्रत्येक मतदान केंद्र प्रमुखाला मतदान केंद्रावर किमान 300 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट दिले असून, हे उद्दिष्ट येत्या 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. याच ताकदीवर आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास भाजपाचे माजी शहर प्रमुख सुशील क्षीरसागर यांनी केले.
भाजपा मोहोळ तालुका व शहर च्या वतीने मोहोळ येथील नगरपरिषदे जवळ "भाजपा सदस्यता महाअभियान 2025" राबविण्यात आले, त्यावेळी क्षीरसागर बोलत होते.