कांदा लिलावाला 'या' दिवशी सुटी! सोलापूर बाजार समितीचा निर्णय | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 3.jpg
कांदा लिलावाला 'या' दिवशी सुटी! सोलापूर बाजार समितीचा निर्णय

कांदा लिलावाला 'या' दिवशी सुटी! सोलापूर बाजार समितीचा निर्णय

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Solapur Market Committee) सध्या सोलापूरसह बीड (Beed), लातूर (Latur), उस्मानाबाद (Osmanabad), पुणे (Pune) आणि कर्नाटकातून (Karnataka) मोठ्या प्रमाणावर कांद्याची (Onion) आवक वाढू लागली आहे. समाधानकारक दर मिळू लागल्याने मागील काही दिवसांपासून दररोज सरासरी 325 ते 350 गाड्यांची आवक आहे. प्रतिक्‍विंटल शंभर रुपये ते तीन हजार 800 रुपयांपर्यंत दर आहे. दरम्यान, ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेनिमित्त (Siddheshwar Yatra) तीन दिवस कांदा लिलाव (Onion Auction) बंद ठेवले जाणार आहेत. (Onion auction will be closed for three days in Solapur market committee)

हेही वाचा: सोलापूर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात! चार तरुण ठार, एक गंभीर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी कांद्याची सर्वाधिक आवक नोंदविली जाते. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीच्या तुलनेत या ठिकाणी कांद्याची आवक येत आहे. व्यवहारातील पारदर्शकता, चांगला दर मिळत असल्याने आवक वाढत असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून नव्या कांद्याची आवक वाढली असून सव्वातीनशे ते साडेतीनशे गाड्यांची आवक आहे. यंदा अतिवृष्टी, अवकाळीमुळे कांद्याचे क्षेत्र कमी झाले व त्यामुळे चांगला दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरीही, आणखी दर वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 12 ते 14 जानेवारी या काळात ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांची यात्रा होणार आहे. त्यानिमित्ताने तीन दिवस बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद राहतील, असेही बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहनही बाजार समितीकडून करण्यात आले आहे.

बाजार समितीची माहिती...

  • बाजार समितीत दररोज सरासरी कांद्याच्या सव्वातीनशे ते साडेतीनशे गाड्यांची आवक

  • प्रतिक्‍विंटल किमान 100 रुपये ते जास्तीत जास्त तीन हजार ते तीन हजार 800 रुपयांचा दर

  • नव्या कांद्याला मिळतोय समाधानकारक दर; श्री सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त तीन दिवस कांदा लिलाव राहणार बंद

  • मकर संक्राती दिवशी लिलाव होणार नाहीत; 12, 13 आणि 14 जानेवारीला कांदा लिलाव बंद

हेही वाचा: Covid Returns! लहान मुले, को-मॉर्बिड, गर्भवतींची घ्या 'अशी' काळजी

ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांची यात्रा, मकर संक्रांतीनिमित्त बाजार समितीतील कांदा लिलाव 12 ते 14 जानेवारी या दिवशी बंद राहणार आहेत. शनिवारी (ता. 15) लिलाव पुन्हा सुरू होतील.

- चंद्रकांत बिराजदार, सचिव, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top