

Onion Farmers Struggle As Market Rates Decline
Esakal
Onion Price Dropped सोलापूर जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन भरघोस झाले असले, तरी बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. प्रतिएकरी सुमारे १ लाख २ हजारांपर्यंत भांडवली खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हातात अवघे ६३ हजार रुपयेच पडत आहेत. चार महिने रात्रंदिवस केलेले श्रम आणि भांडवलातील ३५ ते ४० हजार रुपये दोन्ही बुडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सरकारने गांभीर्याने पावले न उचलल्यास कांदा उत्पादक कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची भीती आहे.