
पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या विविध पूजांसाठी पुढील सहा महिन्यांसाठी आगाऊ नोंदणी करण्यात येणार आहे. भाविकांना २८ जुलैपासून नोंदणी करता येणार आहे. यामध्ये महानैवेद्य पूजेचा नव्याने समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गुरुवारी (ता. २४) दिली.