.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर : ऑनलाइन गेमिंगमध्ये कर्ज झाल्याने चुलत भावाच्याच घरात चोरी करून चार लाख ९२ हजार ५२० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.