esakal | संचारबंदी : जिल्ह्यात ही वाहने सोडली जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

Only important vehicles will be released after the district boundary is sealed

सोलापूर जिल्ह्यातून पुढे जाणारी मोठी वाहने परत पाठवावीत अगर कसे याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून कळवले जाईल. मात्र दुचाकी व चारचाकी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश करू देऊ नये, अशा सूचना असल्याचे करमाळ्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले. जिल्हा बॉर्डर नाकाबंदी दरम्यान बाहेरून येणाऱ्या वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यास अनुसरून अतिरिक्त पोलिस बळ लागत असल्यास तात्काळ कळवावे व योग्य ते नियोजन करावे, सायकल, मोटार सायकलपासून सर्व छोट्या व मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. हुज्जत घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून वाहने जप्त केली जाणार आहेत. 

संचारबंदी : जिल्ह्यात ही वाहने सोडली जाणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसांदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर पाऊल उचलत महाराष्ट्रात संचारबंदी लागु केली आहे. आजपासून सर्व जिल्ह्यांच्या सीमा सुद्धा लॉक केल्या आहेत. यातूनच जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या तालुक्यातील पोलिसांनी रात्री १२ वाजता सर्व रस्ते सील केले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमा व अंतर्गत नाकाबंदीसाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसरून जिल्ह्याच्या सीमेवरील नाकाबंदीसाठी एक अधिकारी नाकाबंदीच्या ठिकाणी किंवा तपासणीसाठी राहील व तीन कर्मचारी राहणार आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर बॅरिकेट्स, बॅटरी, चारपाई, डासाचे साहित्य, लाईटची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था याची व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये नाकाबंदी दरम्यान तालुक्यातून बाहेर जाणारी वाहने चेक करण्याची आवश्यकता नसून ती वाहने बाहेर जाऊ द्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबर बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून येणारी वाहने माघारी पाठवावीण्यात येणार आहेत. यातून औषधी द्रव्य, धनधान्य, जनावरांसाठी खाद्यपदार्थ, पिकांसाठी औषधे, दुध, वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका, साखर कारखाना संबंधाने असलेली वाहने व अधिकाऱ्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटणारी वाहने सोडण्यात येणार आहेत.
या वाहनांव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातून पुढे जाणारी मोठी वाहने परत पाठवावीत अगर कसे याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून कळवले जाईल. मात्र दुचाकी व चारचाकी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश करू देऊ नये, अशा सूचना असल्याचे करमाळ्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले. जिल्हा बॉर्डर नाकाबंदी दरम्यान बाहेरून येणाऱ्या वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यास अनुसरून अतिरिक्त पोलिस बळ लागत असल्यास तात्काळ कळवावे व योग्य ते नियोजन करावे, सायकल, मोटार सायकलपासून सर्व छोट्या व मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. हुज्जत घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून वाहने जप्त केली जाणार आहेत.