
सोलापूर : स्पा-मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. २१) शहरातील जुनी मिल आवारात उघडकीस आला. अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून तिघा महिलांची सुटका केली. याप्रकरणी मसाज सेंटर चालविणाऱ्या दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.