

Solapur Politics Heats Up as Opposition Faces Appear at Mahayuti Gathering
sakal
सोलापूर : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ११) झालेल्या महायुतीच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या आजी-माजी पाच आमदारांनी हजेरी लावल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महायुतीची एकजूट दाखवतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना राजकीय धक्का दिल्याची चर्चा या निमित्ताने रंगली.