

Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
sakal
पंढरपूर: स्वयंभू श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये. त्याऐवजी नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करावी, अन्यथा याविरोधात न्यायालयात जाऊ, असा थेट इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी बुधवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिला. यापूर्वीच वारकरी पाईक संघानेही रासायनिक लेपन प्रक्रियेला विरोध केला आहे.