esakal | वेतन देयके स्वीकारण्याचे आदेश द्या :  खासगी प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीची मागणी

बोलून बातमी शोधा

education.jpg

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. डीसीपीएस योजनेचे केंद्र सरकारच्या एनपीएस योजनेत समाविष्ट करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.

वेतन देयके स्वीकारण्याचे आदेश द्या :  खासगी प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीची मागणी
sakal_logo
By
संतोष सिरसट

उ. सोलापूर,(सोलापूर) : जिल्ह्यातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळेतील शाळांची वेतन देयके स्वीकारण्याचे आदेश सबंधित कार्यालयास द्यावेत, अशी मागणी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्याकडे केल्याची माहीती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश सचिव सुनिल चव्हाण यांनी दिली. 
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. डीसीपीएस योजनेचे केंद्र सरकारच्या एनपीएस योजनेत समाविष्ट करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यामुळे डीसीपीएस धारकांची खाती एनपीएस योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची खाती एनपीएस मध्ये वर्ग होण्यास अडचणी येत आहेत. काही शिक्षक कर्मचाऱ्यांना एनपीएस खाते क्रमांक मिळाले नाहीत. वेतन देयकात एनपीएस कपात न झाल्यामुळे संबंधित शाळांचे वेतन देयके वेतन पथक कार्यालयाकडून स्वीकारण्यास नकार देत आहेत. डीसीपीएस खाती एनपीएस मध्ये समाविष्ट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येऊन वेतन देयके स्वीकारण्याचे आदेश संबंधित कार्यालयास द्यावेत. एप्रिलचा एक आठवडा उलटला तरी अद्याप वेतन देयके स्वीकारण्यात आले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 3000 खासगी प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. वेतन देयके स्वीकारुन तातडीने देयके पारीत करण्याबाबत शिक्षण उपसंचालक पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर विनोद आगलावे, मुरलीधर कडलासकर, विरभद्र यादवाड व अ.गफुर अरब यांच्या सह्या आहेत. 

देयके स्वीकारण्याचे आदेश दिले
याविषयी डॉक्‍टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने माझ्याकडे निवेदन दिले आहेआहे. सोलापूरच्या वेतन अधीक्षकांना त्यांची वेतन देयके स्वीकारण्याचे आदेश मी दिले आहेत. 
औदुंबर उकिरडे,शिक्षण उपसंचालक, पुणे