esakal | सत्ता आली की बारामती करांनी पाणी पळवीले 
sakal

बोलून बातमी शोधा

Outrage in Pandharpur taluka for neera water

सत्ता आली की बारामती करानी दुष्काळी तालुक्‍याचे पाणी पळवीले, असे म्हणत पाण्यासाठी सोनके- तिसंगी परिसरातील शेतकऱ्यांनी कॅनोलमध्ये उतरून सरकारच्या विरोधात निदर्शने केली. "आमचे हक्काचे पाणी मिळावे' या मागणीसाठी अंदोलन करण्याची तयारी शेतकरी करीत आहेत.

सत्ता आली की बारामती करांनी पाणी पळवीले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिसंगी (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या पाणीवाटपात पंढरपूरसह परिसरातील तालुक्‍यावर अन्याय झाला आहे. असा सुर शेतकऱ्यातून निघत आहे. समन्यायी वाटप केल्याचे सत्ताधारी म्हणतात. पण ही दिशा भुल करून पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्‍याचे हक्काचे पाणी इतरत्र वळवून येथील शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप केला जात आहे. सत्ता आली की बारामती करानी दुष्काळी तालुक्‍याचे पाणी पळवीले, असे म्हणत पाण्यासाठी सोनके- तिसंगी परिसरातील शेतकऱ्यांनी कॅनोलमध्ये उतरून सरकारच्या विरोधात निदर्शने केली. 
"आमचे हक्काचे पाणी मिळावे' या मागणीसाठी अंदोलन करण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. यावेळी पाडुरंग कारखान्याचे संचालक तानाजीराव वाघमोडे, सहकर शिरोमणीचे संचालक भारत कोळेकर, माजी सरपंच हेमंतकुमार पाटील, दशरथ थोरात, मल्हारी खरात, शंकर थोरात, शिवाजी बनसोडे, औंदूबर शेळके, हणमंत मेटकरी, अर्जून खरात, मोहन रूपनर, सुनिल रोकडे, धोंडिराम शेळके, गोरख बंडगर, नवनाथ खरात, गोरख बंडगर, राजन ढोणे, जालिंदर पाटील, अकुश जाधव, संभाजी मेटकरी, नाना महारनवर उपस्थित होते. यावेळी हरिदास थोरात म्हणाले, तिसंगी- सोनकेसह परिसरातील 10 गावांवर सतत पाण्यासाठी अन्याय होतो. पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हक्काचे पाणी मिळावे. 
तानाजी वाघमोडे म्हणाले, पंढरपूर- सांगोला हा दुष्काळी भाग आहे. या भागावर सतत अन्याय होत आहे. हक्काचे पाणी मिळत नाही. इंग्रज काळात वाटप झालेले पाणी, सत्ताधारी पाणी पळवापळवी करत आहेत. लोकप्रतिनिधी मात्र बोलायला तयार नाहीत. मल्हारी खरात म्हणाले, दोन वर्ष झाले शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. पाऊस पडला पाणी मिळेल, अशा आशा होती पण सत्ताधारी लोकांनी पाणी पळवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आमचे हक्काचे पाणी मिळावे. हणमंत मेटकरी म्हणाले, आम्हा शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. हक्काचे पाणी मिळाले तर शेती पिकेल. नाहीतर विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांप्रमाणे आम्हावर आत्महत्या करण्याची वेळ येईल.