

Preserve Solapur’s Cultural Identity, Says MP Praniti Shinde
Sakal
सोलापूर: काँग्रेसच्या पराभवावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “दोन कदम पीछे नही, 50 फूट नीचे गिरे, गिरे तो गिरे फिर भी टांग ऊपर” अशी काँग्रेसची स्थिती असल्याची टीका केली होती. या टीकेला खासदार प्रणिती शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिले. पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावरून त्यांची संस्कृती दिसतात. सोलापूर हे प्रतिष्ठित शहर आहे, बाहेरच्या लोकांनी ही प्रतिष्ठा बिघडवू नये, असे खडेबोल पालकमंत्री गोरे यांना सुनावले.