Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना हवी निराधार योजना; वेळेवर पैसे मिळत नसल्याची तक्रार; लाभ बंद करण्याची ५३ महिलांची मागणी
Solapur News: ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सहा महिन्यांपासून वेळेवर मिळत नाही. राज्यभरातील दहा लाखांहून अधिक महिलांचे लाभ थांबवले गेले असून, सोलापूर जिल्ह्यातील काही महिलांनी 'संजय गांधी निराधार योजना' स्वीकारण्याची विनंती केली आहे.
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर २०२४ पर्यंत वेळेवर लाभ मिळाला, पण सहा महिन्यांपासून लाभ वेळेत मिळत नाही. जूनचा लाभ अजून मिळालेला नाही.