
अक्कलकोट : श्री गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तात्रेयांचे चौथे अवतार म्हणून ओळखले जाणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अक्कलकोट येथील मंदिरात सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली. ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’चा जयघोष करीत अनेक पालख्या, दिंड्या अक्कलकोटमध्ये दाखल झाल्या. पहाटेपासून स्वामींच्या दर्शनासाठी एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांग लागली होती.