
सोलापूर: घरबसल्या वीजबिल भरण्याकडे महावितरणच्या ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे बिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहेत. जिल्ह्यात दरमहा सव्वातीन लाखांहून अधिक ग्राहक वीजबिल ऑनलाइन भरण्यास पसंती देत आहेत. ही संख्या एकूण ग्राहकांच्या ७१ टक्के इतकी आहे.