
सोलापूर : गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार १८५ शेतकऱ्यांना १९६ कोटी ८१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ही नुकसान भरपाई वेगवगेळ्या तीन कारणांसाठी मंजूर केली आहे. त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटीची भरपाई मिळाली आहे. मात्र, पिकांचे काढणी पश्चात व उत्पादनावर आधारित नुकसान झालेले ७३ हजार ७१८ शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी एकूण ८२ कोटी निधीची आवश्यकता आहे.