दुःखांना हरवून संकटावर मात, स्वत:चा प्रापंचिक गाडा सांभाळत इतरांचाही प्रपंच उभारण्यास सहकार्य 

logo
logo

मोहोळ : जन्माला येणाऱ्या प्रत्येक स्त्रिच्या नशिबी नियतीने ठरविलेल्या काही बऱ्या-वाईट गोष्टींचा ससेमिरा काही केल्या सुटता सुटत नाही. असा एक गैरसमज समाजात रूढ आहे. पण समाजात अशाही काही कर्तृत्वावान महिला आहेत. कोणत्याही संकटांना न डगमगता प्राप्त परिस्थितीवर मात करीत ज्यांनी प्रापंचिक गाडा सांभाळत इतरांचाही प्रपंच उभारण्यास सहकार्य करीत आहेत. अशा महिलांपैकी एक महिला म्हणजे मोहोळ येथील अनुराधा बाळासाहेब कुंभार होय. 

मोहोळ येथील माजी सैनिक नागनाथ गणपत कुंभार यांच्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजेच अनुराधाचा विवाह 999 मध्ये कळंब तालुक्‍यातील शेतीकामामध्ये मजुरी करणाऱ्या बाळासाहेब कुंभार यांच्याबरोबर झाला. अनुराधाचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झालेले. मुलाच्या शिक्षणासाठी पतीसह मोहोळला आल्यानंतर प्रपंचात मदत करण्यासाठी अनुराधा या घरीच हातावरील कुंभारकाम करू लागल्या. त्यामध्ये गणपती-मातीच्या चुली-रांजण यांचा समावेश असायचा. पंरतु यामध्ये प्रापंचिक खर्च भागत नसल्यामुळे कुंभार काम करीतच पाटकूल येथे एका टिश्‍युकल्चर फार्ममध्ये चार वर्ष रोजंदारीवर काम केले.

पंरतु कुंभार कामासाठी आवश्‍यक असणाऱ्या मातीसह कच्चा माल मिळणे, दुरापास्त झाल्यामुळे व प्रपंचाचा खर्चही वाढल्यामुळे स्वयंरोजगाराच्या दृष्टीने इलेक्‍ट्रिक दुकानामध्ये कुलर, मिक्‍सर दुरूस्तीसह बायडिंग करण्याची कला आत्मसात केली. याचवेळी कुंभार खाणी येथे स्वखर्चाने लहान मुलांसाठी अंगणवाडी चालू केली, तर दुपारच्या वेळेत एका पतसंस्थेची पिग्मी गोळा करण्याचे काम सुरू केले. या विविध कामाच्या माध्यमातून काही पैशाची बचत करून त्यातून फॅन रिवाईडिंगची मिशन घेतली व घरच्या घरी फॅन दुरुस्तीची कामे करू लागल्या. 

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या प्रोत्साहनाने स्थापन करण्यात आलेल्या आसपासच्या दहा महिला बचत गटामध्ये प्रथमतः सभासद झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:च अध्यक्ष होत कुंभारकाम करणाऱ्या महिलांचा एक गट स्थापन केला. यामध्ये प्रत्येकी 100 रूपये मासिक बचत असून, एकूण भागभांडवल 60 हजार रूपये आहे. त्यातून प्रत्येक सभासदाला 1 टक्‍के दराने पाच हजार रूपये कर्जवाटप करण्यात येते. या कामाबरोबर समूह साधन व्यक्ती म्हणून काम करताना संबधित बचत गटाच्या अध्यक्ष अथवा सचिवांच्या घरी मासिक बैठका घेऊन सदर बचत गटाचा हिशोब पाहणे, शासनाच्या योजनाची माहीती देणे, आर्थिक बचतीस प्रवृत्त करणे आदी कामे करत आहेत. 

उद्दिष्ट्ये अन ध्येय 
बचत गटाच्या तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अधिक भक्कम करणे व सर्वसामान्य स्त्रियापर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे हे उद्दिष्ठ आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com