सोलापूर शहरातील गुन्हेगारी घटना घडामोडींचा आढावा

 An overview of criminal incidents in Solapur city
An overview of criminal incidents in Solapur city
Updated on

ड्रेनेजच्या फटीतून झुरळ बाहेर आल्याने मारहाण 

सोलापूर : ड्रेनेजच्या चेंबरमधून झुरळ बाहेर येत असल्याच्या कारणावरून वाद होऊन महिलेस मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संतोष चौधरी, अर्चना चौधरी, शांताबाई, त्यांचे दोन भाऊ, पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 


ही घटना 28 मार्च रोजी घडली आहे. पद्मा अशोक बिद्री (वय 40, घोंगडे वस्ती, नारायण पावचटणी दुकानाजवळ, भवानी पेठ सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महानगरपालिकेच्या कामगारांनी बिद्री यांच्या घरासमोरील ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम केले होते. ड्रेनेज बंद करून गेल्यानंतर चेंबरच्या फटीतून झुरळ बाहेर येऊ लागले. ते पाहून शेजारी राहणाऱ्या संतोष चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांनी बिद्री यांना शिवीगाळ करून वाद घातला. ड्रेनेजची फट बंद करून घेते असे सांगूनही भांडण केले. पद्मा बिद्री यांच्यासह त्यांचा मुलगा, मुलगी यांना मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

गावाला गेल्यावर घरफोडी 
मुलाला भेटण्यासाठी पुण्याला गेल्यानंतर चोरट्याने घर फोडले. ही घटना 15 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास जुळे सोलापुरातील जानकी नगरात घडली होती. मनोहर दरप्पा जाधव (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे. गावाला जाताना शेजाऱ्यांना लक्ष देण्यास कळविले होते. भाडेकरूही कुटुंबासोबत गावाकडे गेले होते. चोरट्याने बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चार चांदीची नाणी, असा एकूण 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. 

थांबलेल्या ट्रकची बॅटरी चोरीला 
होटगी रोडवरील औद्योगिक वसाहत परिसरातील आडकी काट्याच्या पुढे एसएम रबर कंपनीसमोर थांबलेल्या ट्रकची बॅटरी चोरला गेली. याप्रकरणी मुस्ताकअहमद म.इसाक कुरेशी (वय 60, रा. सिद्धेश्‍वर पेठ, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 25 मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. चोरट्याने रस्त्यावर लावलेल्या ट्रकची सहा हजार रुपयांची बॅटरी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com