ओवैसींनी सांगितलं शिवसेनेचं भविष्य; म्हणाले, '2024 साली शिवसेना नक्कीच...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओवैसींनी सांगितलं शिवसेनेचं भविष्य; म्हणाले, '2024 साली शिवसेना नक्कीच...'

ओवैसींनी सांगितलं शिवसेनेचं भविष्य; म्हणाले, '2024 साली शिवसेना नक्कीच...'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सोलापूर: एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. शिवसेनेच्या भूमिकेविषयी भाकित करताना त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर अविश्वास देखील व्यक्त केला आहे. तसेच 2024 साली शिवसेनेची काय भूमिका असेल, याबाबत त्यांनी भाकित देखील वर्तवलं आहे.

हेही वाचा: ST Strike: 'तोपर्यंत अंतरिम वाढीचा पर्याय दिलाय' - अनिल परब

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी म्हटलंय की, हे सरकार म्हणजे थ्री इन वन आहे की टू इन वन आहे ते काही कळत नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे चेष्टा वाटली का यांना? याला धर्मनिरपेक्षता म्हणतात का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांवर आरोपांची तोफ डागताना त्यांनी म्हटलंय की, शिवसेनेला सत्ता देऊन तुम्ही स्वत: धर्मनिरपेक्ष समजता का? तुम्ही धर्मनिरपेक्षतेविषयी बोलता का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी ओवैसींनी राहुल गांधींना देखील थेट आव्हान दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिंदुत्वाविषयी फारच बोलत असतात. महाराष्ट्रात सध्या काय घडत आहे, त्याविषयी त्यांनी आधी बोलावं. त्यावर बोलायची हिंमत राहुल गांधींमध्ये आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा: पत्नीचा खून करून पती फरार! दोन चिमुकली मुले झाली पोरकी

पुढे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटलंय की, याच विषयावर राष्ट्रवादीला बोलायला सांगा. पुढे ते म्हणाले की, जेंव्हा आम्ही निवडणूक लढवायला आलो तेंव्हा हे म्हणायला लागले की तुम्ही मतांची विभागणी करत आहात. आम्ही मतांची मागणी केली तर तुम्ही आम्हाला जातीयवादी म्हणता आणि दुसरीकडे तुम्हीच शिवसेनेला सत्ता दिली आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलंय. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बोलू शकता, मात्र आम्ही नाही? तुम्ही धर्मनिरपेक्षतेचा ठेका घेतलाय का? असं देखील ओवैसी म्हणाले आहेत.

2024 ला शिवसेनेची भूमिका

लवकरच हे सरकार पडेल, अशी भाकितं भाजपकडून सातत्याने वर्तवण्यात येतात. 2024 ला तुम्ही बघा, शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल, असं थेट भाकित देखील ओवैसींनी वर्तवलं आहे.

loading image
go to top