

वैराग : पाणी फाउंडेशनच्या फार्मर कपमधून प्रशिक्षण घेत कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्याची चळवळ वेगाने पुढे सरकत आहे. याच चळवळीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाला प्रथम पुरस्कार तर मुंगशी (आर) आणि भालगाव या गावांना विभागून द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.