
Solapur Doctor In Kashmir: पहलगाममध्ये अतिरेकी गोळीबार करून लोकांचा जीव घेताना तेथून केवळ एका तलावाच्या पलीकडील किश्तवाड येथे डॉक्टर गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया करून लोकांचे प्राण वाचवत होते. चार वर्षांपासून सुरू असलेल्या या शस्त्रक्रिया शिबिराचे नायक सोलापुरातील डॉ. राजीव प्रधान हे आहेत. यापूर्वीही एकदा त्यांच्या जवळच्याच भागात अतिरेकी हल्ला झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.