
-सूर्यकांत बनकर
करकंब: पांढरेवाडी (ता. पंढरपूर) येथील सद्गुरू महिला बचत गटाने तब्बल पन्नास बेडचा गांडूळ खत प्रकल्प उभारून साडेचार लाख रुपये गुंतवणुकीतून केवळ तीनच महिन्यांत वीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. या माध्यमातून बचत गटातील महिलांचे जीवन तर स्वावलंबी झालेच पण सेंद्रिय शेतीसही प्रोत्साहन मिळाले आहे.