Ashadhi Wari Pandharpur 2026 crowd news
esakal
पंढरपूर : शासकीय महापूजेच्या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंद ठेवण्यात येते. मात्र, यावर्षी प्रशासनाने शासकीय महापूजेच्या वेळी मुखदर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय (Vitthal temple darshan queue today) घेतला. त्यामुळे भाविकांना मुखदर्शनाचा लाभ घेता आला. सध्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी किमान २४ ते २५ तासांचा अवधी लागत असून, मुखदर्शनाची रांगही तीन किलोमीटरपर्यंत गेली आहे.