Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Government Mahapuja 2026 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. गौरगावच्या शेतकरी दाम्पत्याला मानाचा वारकरी सन्मान मिळाला.
Devendra Fadnavis Vitthal Mahapuja in Pandharpur

Devendra Fadnavis Vitthal Mahapuja in Pandharpur

esakal

Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणीची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज (ता.25) पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते भक्तीभावाने व उत्साहाने संपन्न (CM Devendra Fadnavis Vitthal Mahapuja in Pandharpur) झाली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान बाळासाहेब माधव माने व त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने (रा. गौरगांव, ता. कळंब जि. धाराशिव) या शेतकरी दाम्पत्याला मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com