

Pandharpur Corridor News Affected Residents Protest Land Acquisition Notices and Demand Protection of Their Properties
sakal
पंढरपूर : कोणाचीही मागणी नसताना कोट्यवधी रुपये खर्चून जबरदस्तीने कॉरिडॉर उभारला जात असल्याच्या निषेधार्थ पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने बुधवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कॉरिडॉरबाधित नागरिकांनी भूसंपादनाच्या नोटिसांना विरोध दर्शवत शासनाच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अनेक बाधितांनी आपल्या हरकतीही सादर केल्या.