

Pandharpur Flood Alert Chandrabhaga River Overflows After Ujani Dam Discharge 100 Families Moved to Safety
sakal
पंढरपूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी (ता. १) रात्री उशिरा नदीकाठावरील अंबाबाई पटांगण आणि व्यास नारायण झोपडपट्टीतील काही घरांमध्ये पाणी शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या भागातील सुमारे १०० कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असून, विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.