
पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा लवकरच शुध्द होणार आहे. चंद्रभागेच्या पात्रातील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी परदेशी टॅक्नालिजीचा वापर केला जाणार आहे. येत्या 26 जानेवारी रोजी प्रत्यक्ष चंद्रभागा शुद्धी करण्याचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे भाविकांना स्वच्छ आणि शुद्ध पाण्यात स्नान करता येणार आहे.