esakal | भालके म्हणाले चिखलफेक करणाऱ्याला गाडीला बांधून फरफटत नेऊ?

बोलून बातमी शोधा

Pandharpur MLA Bhalke demands inquiry

विठ्ठल साखर कारखाना यंदा बंद आहे. त्यातच शेतकर्यांची एफआरपी आणि कामगारांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सतत आंदोलने केली जात आहेत. कारखान्याच्या विरोधात आंदोलन करुन कारखान्याला बदनाम केले जात असल्याचा आरोप आमदार भारत भालके यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता.

भालके म्हणाले चिखलफेक करणाऱ्याला गाडीला बांधून फरफटत नेऊ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्याकडे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपद येण्यापूर्वीची आणि सध्याची संपत्ती किती आहे. यांची ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळणवर यांनी पत्रकार परिषदेत केली.
विठ्ठल साखर कारखाना यंदा बंद आहे. त्यातच शेतकर्यांची एफआरपी आणि कामगारांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सतत आंदोलने केली जात आहेत. कारखान्याच्या विरोधात आंदोलन करुन कारखान्याला बदनाम केले जात असल्याचा आरोप आमदार भारत भालके यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आमदार भारत भालकेंनी कारखान्याचे व्यवस्थापन चुकीच्या पध्दतीने चालवल्यामुळेच कारखाना बंद पडल्याचा आरोप करत, त्यांच्या बेनामी संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली.
श्री. हळणवर म्हणाले, शेतकर्यांची एफआरपी आणि कामगारांचे थकीत वेतन मिळावे यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने संचालक मंडळावर चिखल फेक आंदोलन जाहीर केले होते. त्यापूर्वीच आमदार भालके यांनी आमच्यावर चिखलफेक करणार्यांना गाडीला बांधून फरफटत नेऊ. प्रसंगी आम्ही काही ही करु असे सांगितले होते. आमदार भारत भालकेंच्या चिथवणीखोर वक्तव्यामुळे माझ्या जीवाताला धोका निर्माण झाला आहे. संबंधीतावर कारवाई करावी या मागणीचे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
कामगारांनी कारखाना बंद पडल्याचा त्यांचा आरोप खोटा आहे. गेली चाळीस वर्षे ज्या कामगारांनी कारखाना मोठा केला त्याच कामगारांवर आमदार भालके आरोप करत आहेत. त्यांनी आठरा वर्षात जे पाप केले आहे, ते झाकण्यासाठी ते असं खोटे आरोप करत आहेत. शेतकर्यांची आणि कामगारांची थकीत देणी देण्यासाठी राज्य सरकारने 30 कोटी रुपये दिले होेते. परंतु त्यांनी शेतकर्यांची थकीत रकक्म न देता, कारखान्याच्या एका ठेकेदाराला सहा कोटी रुपये लागलीच कसे काय दिले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांचे शेतकर्यांवर प्रेम राहिले नसून ठेकेदार आणि बगलबच्च्यांवर त्यांचे अधिक प्रेम आहे. कारखान्याच्या 28 हजार सभासदांमध्ये आम्ही जागृती करण्याचे काम करत आहे. योग्य वेळी सभासदच निर्णय घेतील. सध्या जे कारखान्याच्या बाबती सुरु आहे. ते मात्र दुर्देवी असल्याचेही कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले यांनी सांगितले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजन शेख, मंगळवेढा तालुका अध्यक्ष दामाजी मोरे, अशिष तांबोळी,धनाजी बनसोडे, नितीन काळे आदी उपस्थित होते.