कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज! मुख्याधिकारी अरविंद माळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपूर कार्तिक यात्रा

कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज!

पंढरपूर (सोलापूर) : कार्तिक शुद्ध एकादशी 15 नोव्हेंबर रोजी होणार असून कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्‍यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

हेही वाचा: आणि वारकरी आनंदले..! तब्बल वीस महिन्यांनंतर कार्तिकी यात्रा भरणार

कार्तिकी यात्रा

कार्तिकी यात्रा

कार्तिकी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र वाळवंट, 65 एकर परिसर, पत्रा शेड आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1340 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये 340 कायम तर 1000 हंगामी कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच शहरासह 65 एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह, मॅंलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या, कॉम्पॅक्‍टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट 65 एकर परिसर, रेल्वे मैदान आदी ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात आली आहेत.

हेही वाचा: कार्तिकी यात्रा काळात एसटी प्रवाशी वाहतूक सुरूच राहणार 

कार्तिकी यात्रा

कार्तिकी यात्रा

वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये, म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूक देखील करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री. माळी यांनी दिली. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यासह प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीचे काम सुरु असून काही ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच 65 एकर येथे अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा, यासाठी सात हायमास्ट दिवे चालू करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक शौचलयातही लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच नदीपात्र येथे 20 मीटर उंचीचे 9 हायमास्ट दिवे चालू केले असून सर्व घाटांवर तसेच पत्राशेड व वाहनतळ येथेही लाईट व्यवस्था करण्यात येत आहे.

हेही वाचा: वारकऱ्यांसाठी खुषखबर! आरोग्यमंत्री म्हणाले, कार्तिकी वारीला परवानगी

कार्तिकी यात्रा

कार्तिकी यात्रा

शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटीसा देण्यात आल्या असून, शहरातील व वाळवंटातील अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू आहे. वाहनतळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले असून, आवश्‍यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आली आहेत. तसेच मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करण्यात आला असल्याचे श्री.माळी यांनी सांगितले. यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी श्री. माळी यांनी केले आहे.

loading image
go to top