Pandharpur Municipal Election
esakal
पंढरपूर : पंढरपुरात नगरपालिका निवडणुकीची (Municipal Elections in Pandharpur) मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे परिचारक विरोधी (भाजप) आघाडीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरुन घमासान सुरु झाले आहे. ऐनवेळी प्रणिता भालके (Pranita Bhalke) यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनीही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे जाहीर केले आहे.