दुर्दैवी घटना!'चंद्रभागेत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू'; पंढरपुरात स्नानावेळी घटना, जालना जिल्ह्यातील दोन महिला
Tragedy in Pandharpur: भोकरदन येथील महिला शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भक्तपुंडलिक मंदिराजवळ नदीपात्रात स्नानासाठी उतरल्या असता, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संगीता सपकाळ, सुनीता सपकाळ व आणखी एक अनोळखी अशा तिघी पाण्यात बुडाल्या.
"Tragedy during holy dip — three women devotees drown in Chandrabhaga at Pandharpur."Sakal
पंढरपूर : चंद्रभागेत स्नान करताना तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोन महिलांची ओळख पटली असून त्या जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख शनिवारी रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती.