नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना अटक !

नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना अटक! पंढरपूर पोलिसांनी केली कर्नाटकातील म्हैसूर येथे कारवाई
नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना अटक !
नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना अटक !Canva
Summary

नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणातील दोन फरार संशयित आरोपींना पंढरपूर पोलिसांनी कर्नाटकमधील म्हैसूर येथे शिताफीने अटक केली.

पंढरपूर (सोलापूर) : नगरसेवक संदीप पवार (Corporator Sandeep Pawar) खून (Crime) प्रकरणातील दोन फरार संशयित आरोपींना पंढरपूर पोलिसांनी (Pandharpur) कर्नाटकमधील (Karnataka) म्हैसूर येथे शिताफीने अटक केली. या खून प्रकरणातील "सरजी टोळी'शी (Sirji Gang) संबंधित असलेल्या सुनील वाघ (Sunil Wagh) आणि सचिन देवमारे (Sachin Devmare) यांना म्हैसूर (Mysore) येथून पंढरपूर येथे आणण्यात आले आहे. आता या खून (Pandharpur Crime) प्रकरणातील आणखी एक आरोपी फरारी आहेत.

नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना अटक !
'उजनी' पर्यटन केंद्रासाठी सहा कोटींचा निधी मंजूर !

18 मार्च 2018 रोजी येथील माजी नगराध्यक्षा सुरेखा दिलीप पवार यांचा मुलगा नगरसेवक संदीप दिलीप पवार हे स्टेशन रस्त्यावरील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये ते बसलेले असताना अज्ञात लोकांनी कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून केला होता. सरजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुंडांच्या टोळीने हा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. या खून प्रकरणातील एकूण 27 आरोपींपैकी 24 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

उर्वरित तीनपैकी सुनील वाघ, सचिन देवमारे आणि अन्य एक असे तीन संशयित आरोपी फरार होते. त्यातीन पैकी सुनील वाघ आणि सचिन देवमारे हे कोल्हापूर, बेळगाव येथे काही दिवस राहिले आणि गेल्या काही दिवसांपासून ते दोघे कर्नाटकमधील म्हैसूर येथे नाव बदलून राहात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना अटक !
आरक्षणाशिवाय महापालिका, झेडपीच्या निवडणुका नकोच !

जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शोध घेतला जात होता. पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी म्हैसूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. मगदुम यांच्या पथकातील शरद कदम, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, सुनील बनसोडे, सुजित जाधव, विनोद पाटील यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेत सुनील वाघ आणि सचिन देवमारे या दोघांना म्हैसूर येथे अटक करून पंढरपूरला आणले आहे. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आता या प्रकरणातील आणखी एक आरोपी अटक करावयाचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com