Solapur Crime : दोन लाखांचे बियाणे जप्त; पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी; दोघांना अटक
पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींकडून एक लाख रुपये किमतीचे पंचगंगा कंपनीचे दोन पेट्या कांद्याचे व एक लाख रुपये किमतीचे अॅडवॅटा कंपनीचे पाच पोती मका बियाणे ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बियाण्यांची चोरी केली असल्याची कबुली दिली.
Pandharpur police with seized illegal seeds worth ₹2 lakh; two accused taken into custodySakal
पंढरपूर : ऐन खरीप हंगामामध्ये पंढरपूर पोलिसांनी बियाणे चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बियाणांची चोरी करून त्या निम्या किमतीने विक्री करणाऱ्या दोन संशयित आरोपींकडून दोन लाख रुपये किमतीचे कांदा आणि मक्याचे बियाणेही जप्त केले आहेत.