

Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
sakal
-भारत नागणे
पंढरपूर: राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरात भाविकांसह वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत नऊ रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा आणि दोन पुलांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे ४९३ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्व कामांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे.