Pandharpur Darshan: आषाढी एकादशीपूर्वी भक्तांसाठी खुशखबर! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू; व्हीआयपी अन्‌ टोकन बंद

Pandharpur temple arrangements for Ashadhi pilgrimage: आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे अखंड २४ तास मुखदर्शन व २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन; सर्वांसाठी समान रांग, व्हीआयपी व टोकन व्यवस्था पूर्णपणे बंद
Pandharpur Gears Up for Ashadhi Ekadashi with Round-the-Clock Darshan for Devotees

Pandharpur Gears Up for Ashadhi Ekadashi with Round-the-Clock Darshan for Devotees

sakal

Updated on

पंढरपूर : ‘आतां कोठें धावे मन, तुझे चरण देखिलिया। भाग गेला सीण गेला, अवघा झाला आनंद...’ या संतोक्तीप्रमाणे लाखो भाविक विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी पंढरीकडे धाव घेत आहेत. येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होत असून, त्यासाठी देश-विदेशांतून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होणार आहेत. जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने गुरुवारपासून (ता. १६) २४ तास दर्शन व्यवस्था सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com